दयानंद पांडेला 26 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

December 12, 2008 11:16 AM0 commentsViews: 1

12 डिसेंबर, नाशिक / मुंबईमालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी आज नाशिक आणि मुंबईतील कोर्टात झाली. बनावट शस्त्रास्त्र प्रकरणी पुरोहितला आज नाशिक कोर्टात हजर करण्यात आलं होतं. आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितला 23 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आलीय तर मालेगाव बॉम्बस्फोटातला आणखी एक आरोपी दयानंद पांडे याला 26 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आलीय. त्याला आज मुंबई कोर्टात हजर करण्यात आलं होतं. दयानंद पांडे यांचे वकील यावेळी कोर्टात उपस्थित नव्हते. पोलीस आपली बदनामी करत असल्याचा आरोप दयानंद पांडेनं केलाय. दरम्यान, मालेगाव बॉम्बस्फोटातील आणखी एक आरोपी राकेश धावडेला 16 डिसेंबरपर्यंत सीबीआय कोठडीत ठेवण्याचे आदेश नांदेड न्यायालयानं दिले आहेत.

close