मंत्रीमंडळात फेरबदलाचे संकेत

November 12, 2010 2:23 PM0 commentsViews: 7

12 नोव्हेंबर

नव्या मुख्यमंत्रीपदी पृथ्वीराज चव्हाण यांचा शपथविधी सोहळा गुरुवारी पार पडला. आता काँग्रेसतर्फे मंत्रीमंडळात कोण कोण असेल याचे तर्कवितर्क लढवले जात आहे.

पण काँग्रेसतर्फे मंत्रिमंडळात मोठे फेरबदल केले जाणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले.

'जैसे थे' म्हणून चालणार नाही असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. सर्वांना विश्वासात घेऊन काही कटू निर्णय घ्यावे लागणार आहेत असंही चव्हाण यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादीशी मैत्रीपूर्ण लढत व्हावी शरद पवारांशी आपले वाद नाहीत, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी सांगितले. पण त्यांच्याशी आपले राजकीय मतभेद असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

मंत्रिमंडळात समावेश ?

सतेज पाटील

संजय देवतळे

चंद्रकांत हंडोरे

वसंत पुरके

अमित देशमुख

बसवराज पाटील (औसा)

शोमती ठाकूर

राजेंद्र गावित

प्रशांत ठाकूर

या कॅबिनेट मंत्र्याचा पत्ता कापला जाणार ?

पतंगराव कदमराधाकृष्ण विखे-पाटील

सुभाष झनक

नसीम खान

नितीन राऊत

शिवाजीराव मोघे

या राज्यमंत्र्याचा पत्ता कापला जाणार ?

अब्दुल सत्तार

रणजित कांबळे

वर्षा गायकवाड

close