पहिल्या दिवशी न्यूझीलंडचे वर्चस्व

November 12, 2010 3:53 PM0 commentsViews: 2

12 नोव्हेंबर

हैद्राबाद येथे दुसर्‍या टेस्टला आज सुरुवात झाली. पहिला दिवस न्यूझीलंडच्या बॅट्समननी गाजवला.

टिम मॅकेनटॉशची सेंच्युरी आणि मार्टिन गपटिलची 85 रन्सची इनिंग याच्या जोरावर टीमने पहिल्या दिवशी 4 विकेटवर 258 रन्स असा स्कोअर उभा केला आहे.

न्यूझीलंडची सुरुवात आज अडखळती झाली. आणि चौथ्याच ओव्हरमध्ये ब्रँडन मॅॅक्युलम 4 रनवर आऊट झाला.

पण त्यानंतर मॅकेनटॉश आणि गपटिल ही जोडी जमली. आणि दोघांनी दीडशे रन्सची पार्टनरशिप करत इनिंगची पायाभरणी केली.

गपटिलला प्रग्यान ओझाने 85 रनवर एलबीडब्ल्यू केले. रॉस टेलरही 24 रन करुन आऊट झाला. मॅकेनटॉशने मात्र टेस्टमधली आपली दुसरी सेंच्युरी आज झळकावली.

4 तासांहून जास्त काळ तो पिचवर होता. आणि सेंच्युरीत त्याने 10 फोर आणि 1 सिक्स मारला. सेंच्युरी पूर्ण झाल्यावर मात्र तो लगेच आऊट झाला.

झहीरने त्याला क्लीनबोल्ड केले. खेळ संपला तेव्हा जेसी रायडर 24 आणि हॉपकिन्स 1 रनवर नॉटआऊट होते. भारतातर्फे झहीरने 2 तर ओझा आणि श्रीसंतने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

close