भारताच्या पहिल्या इनिंगमध्ये 6/155

December 12, 2008 11:34 AM0 commentsViews: 3

भारताच्या पहिल्या इनिंगमध्ये 6/15512 डिसेंबर चेन्नईचेन्नई टेस्टच्या दुस-या दिवशी भारताने इंग्लंडला पहिल्या इनिंगमध्ये 316 रन्समध्ये रोखलं. पण त्यानंतर भारताची सुरुवातही खराब झाली.आणि भारताच्या पहिल्या 5 विकेट 100 रन्समध्येच आऊट झाल्या. भारतीय इनिंगची सुरुवातच डळमळीत झाली. सेहवाग, गंभीर आणि द्रविड अवघ्या 37 रन्समध्ये पॅव्हेलियनमध्ये परतले. आपली पहिलीच टेस्ट खेळणा-या इंग्लंडच्या स्वॉननं 2 विकेट घेतल्या. त्यानंतर लक्ष्मण आणि सचिन तेंडुलकरने चौथ्या विकेटसाठी 61 रन्सची पार्टनरशिप करून इनिंग सावरायचा प्रयत्न केला.पण पानेसरने लक्ष्मणला 22 रन्सवर आऊट करुन ही जोडी फोडली. पाठोपाठ फ्लिंटॉफच्या बॉलिंगवर सचिनही आऊट झाला.आणि भारतीय टीम बॅकफूटवर गेली. युवराज सिंग 14 रन्सवर आऊट झाला. दिवसअखेर कप्तान धोणी 24 आणि हरभजन सिंग 12 रन्सवर खेळत होते . त्यापूर्वी, इंग्लंडच्या टीमने 316 रन्स केले ते मॅट प्रायरच्या हाफ सेंच्युरीच्या जोरावर. दुस-या दिवशी भारताच्या पहिल्या इनिंगमध्ये 6 विकेटवर155 रन्स झाले.