होम लोन होणार स्वस्त

December 12, 2008 11:55 AM0 commentsViews: 2

12 डिसेंबर, मुंबई वीस लाखांपर्यंतचं होम लोन आता सात ते साडे आठ टक्क्यांच्या व्याजानं मिळू शकतं. येत्या एक – दोन दिवसांत सार्वजनिक बँका याविषयीची घोषणा करतील. पण याविषयी सरकार आणि बँका यांच्यात अजून एकमत झालेलं नाही. पाच लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 7 टक्के तर 5 ते 20 लाखांपर्यंतचं कर्जासाठी साडे आठ टक्के व्याजदर आकारण्याचा बँकांचा विचार आहे. सोबतच बँका आपली प्रोसेसिंग फी रद्द करतील, अशी शक्यता आहे. घर खरेदीचा प्लॅन असणार्‍या ग्राहकांनी अजून एक – दोन दिवस थांबायला हरकत नाही. कारण लवकरच सार्वजनिक बँका त्यांचे होमलोनसाठीचे व्याजदर कमी करतील अशी शक्यता आहे. यात वीस लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी व्याजदर साडेआठ टक्के केला जाऊ शकेल तर पाच लाखांपर्यंतच्या कर्जासाठी दर सात टक्क्यांपर्यंत येईल अशी शक्यता आहे. देशातल्या 13 प्रमुख सार्वजनिक बँकांच्या प्रमुखांच्या कालच्या बैठकीनंतर ग्राहकांसाठी नक्कीच काहीतरी चांगली बातमी येईल, असं वाटतंय. प्रोसेसिंग फी तसंच डाऊन पेमेंटसाठीचेही दर कमी करण्याविषयी या बैठकीत चर्चा झाली. आता बँकांनी होमलोनसाठीच्या व्याजदरात मोठी घट केल्यास नवीन वर्षात नव्या घरात राहण्याचं अनेकाचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं.

close