राणेंच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल

December 12, 2008 12:07 PM0 commentsViews: 2

12 डिसेंबर काही राजकीय नेते दहशवाद्यांना मदत करत आहेत, असा आरोप राणेंनी केला होता. याबाबतच हायकोर्टात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. ही याचिका हायकोर्टातील वकील अमीन सोलकर यांनी दाखल केली आहे. या याचिकेत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील तसंच भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनाही प्रतिवादी करण्यात आलं आहे. मुख्यमंत्रीपदी अशोक चव्हाण यांची वर्णी लागताच राणेंनी पत्रकार परिषदेत हा खळबळजनक आरोप केला होता. राणेंनी त्यांच्याकडे असलेली माहिती तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनला अ‍ॅफिडेव्हीटच्या स्वरूपात द्यावी, असं याचिकेत म्हटलंय. हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश स्वतंत्रकुमार यांच्या खंडपीठासमोर ही याचिका सुनावणीस येणार आहे.

close