पुण्यातील भाडे कपातीस रिक्षा संघटनांचा विरोध

December 12, 2008 11:10 AM0 commentsViews: 3

12 डिसेंबर पुणेनितीन चौधरी पेट्रोल डिझेलचे दर कमी झाल्यानंतर पुण्यातील पीएमपीएल बससेवा आणि रिक्षा भाड्यात कपात करावी असा आदेश परिवहन प्राधिकरणानं दिला आहे. याबाबतचा अंतिम निर्णय येत्या आठवड्यात घेण्यात येणार आहे. पण या निर्णयाला रिक्षा संघटनांनी विरोध करण्याचं ठरवलं आहे.पेट्रोल दर कपात झाल्यानंतर अ‍ॅव्हरेज काढून रिक्षा संघटनांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असं परिवहन प्राधिकरण, सदस्य- बाबा शिंदे म्हणाले.भाडे कपातीचा आदेश पीएमपीएमला मान्य आहे , पण रिक्षा संघटनांना मान्य नाही. तीन महिन्यांपूर्वी झालेली भाडेवाढ ही सहावेळा पेट्रोलवाढ झाल्यानंतर मिळाली आहे. एकदा भाडेवाढ झाल्यानंतर किमान एक वर्ष तरी त्यात बदल करू नये असं या संघटनांचं मत आहे.याबाबत महाराष्ट्र रिक्षा सेना, अध्यक्ष-नाना क्षिरसागर सांगतात, प्राधिकरणाची भूमिका चुकीची आहे. त्याला आम्ही विरोध करू प्रसंगी रस्त्यावरही उतरू असा इशारा त्यांनी दिला.भाडे कमी व्हायला पाहीजे त्यामुळे सामान्य नागरिकांना होणारा त्रास वाचेल. प्राधिकरणाच्या येत्या बैठकीत याबाबत निर्णय होणार आहे. याची अंमलबजावणी नवीन वर्षाच्या सुरुवातीस करून पुणेकरांना नववर्ष भेट मिळेल अशी आशा आहे.

close