मुख्यमंत्री दिल्लीत

December 12, 2008 1:00 PM0 commentsViews: 5

12 डिसेंबर दिल्लीमुंबईतल्या सुरक्षा व्यवस्थेसाठी जास्तीत निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पंतप्रधानांकडे केली. मुख्यमंत्री चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासमवेत दिल्लीत पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी ही मागणी केली. त्यानंतर त्यांनी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना सांगितलं की त्यांनी महाराष्ट्राच्या सुरक्षेसाठी जादा रक्कम द्यावी अशी विनंती केली. तसंच त्यांनी गृहमंत्री चिदंबरम यांची सुरक्षेसंबधी गेट घेण्याची ठरली होती. पण ते दिल्ली बाहेर असल्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही. सुरक्षेसंबंधी नवीन योजना आहेत त्यासाठी महाराष्ट्र सरकार पूर्ण सहयोग करणार आहेच पण अधिकची केंद्राकडून जी मदत मिळाणार आहे ती मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे.असंही त्यांनी यावेळी पत्रकारांना सांगितलं.

close