नांदेडमध्ये शिक्षिकेच्या गोळीबारात एक ठार

December 12, 2008 1:47 PM0 commentsViews:

12 डिसेंबर, नांदेडसंदीप काळेनांदेडमधल्या तरोडा गावातल्या जिल्हापरिषद शाळेत एका शिक्षिकेनं शाळेतल्या आवारातच एका तरुणाला गोळ्या घालून ठार केलं आहे. शिक्षिकेचं नाव ज्ञानेश्वरी फड आहे. ज्या तरुणाला ठार केलं त्याचं नाव शीलानंद कांबळे आहे. प्रेमप्रकरणाच्या वादातून ही धक्कादायक घटना घडल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. तरोडा गावातल्या जिल्हापरिषदेच्या शाळेत सकाळी नेहमीप्रमाणं विद्यार्थी शाळेत आले होते. त्याच्यानंतर ही घटना घडली आहे. घटना घडल्यानंतर काही वेळातच त्या ठिकाणी पोलीस आले. शिक्षिकेच्या गोळीबारात जो एक युवक ठार झाला आहे, तो त्या शाळेतलाच आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत. या घटननं नांदेडकरांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.

close