औरंबादमध्ये मोठयाप्रमाणात धान्यसाठा जप्त

December 12, 2008 12:44 PM0 commentsViews: 6

12 डिसेंबर औरंगाबादमाधव सावरगावऔरंगाबाद जिल्हा पुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे गरिबांना रेशन मिळणं अशक्य झालं आहे. दुसरीकडे लाखो रुपयांचं रेशन काळ्या मार्गाने विकण्याचं काम राजरोसपणे सुरू आहे. चिकलठाणा परिसरात काळ्या बाजारात जाणारे तब्बल 598 गहू आणि तांदळाची पोती पकडल्यामुळे रेशनच्या धान्याचा काळाबाजार होत आहे हे स्पष्ट झालं. औरंगाबाद शहरातील रेशनकार्ड दुकानावरच्या बोर्डावर मात्र रेशन संपलं आहे असं लिहलेलं आढळतं .आत्ता रेशन दुकानावर येणारा माल कुठे जातो याचाच हा पकडण्यात आलेला मालाच्या पोती पुरावा आहेत. पुरवठा विभागाच्या अधिका-यांच्या दुर्लक्षामळेच सामान्यांच्या तोंडचा घास व्यापारी हिरावतात. पण हे का होतं याचं उत्तर पुरवठा विभागातील अधिका-यांना विचारलं असता ते सांगतात, हे क्षेत्रच इतकं मोठं आहे की अशा घटना होतंच असतात असं, तहसिलदार आणि प्रभारी अन्नधान्य वितरण अधिकारी, रमेश मुंगलाडे यांनी सांगितलं.काळ्या बाजारात विकण्यासाठी दडवून ठेवलेला रेशनचा माल एमआयडीसी, सिडको पोलिसांनी समोर आणला. हा सगळा धान्यसाठा जप्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे आत्ता कुठे पुरवठा विभागाला जाग आली आहे.411 पोतीे गहू आणि 187 पोती तांदूळ पकडला आहे. त्याचबरोबर 6 आरोपी अटक केले आहेत. अशी माहिती एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्याचे पीआय, पी.एम.टाकळीकर यांनी दिली.पुरवठा विभागाकडून दिला जाणारा कोटा पुरत नसल्याचं वारंवार रेशनदुकानदार तक्रार करीत असतात. त्यापैकी किती कोटा रेशनदुकानदार गरीब रेशनकार्डधारकांना देतात हा एक प्रश्नच आहे. हे सगळं होतय ते फक्त पुरवठा विभागाच्या हलगर्जीपणामुळे. आज इतका मोठा साठा पकडला मात्र असे साठे किती आहेत.याचा तपास कोण करणार हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे.

close