सोलापूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये उसन्या डॉक्टरांचा प्रकार उघडकीस

December 12, 2008 2:52 PM0 commentsViews: 3

सिध्दार्थ गोदाम 12 डिसेंबर, सोलापूर सोलापूरमधील मेडिकल कॉलेजमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या निरीक्षकांसमोर कॉलेजमधील डॉक्टरांची पूर्ण संख्या दाखवण्यासाठी कॉलेजनं उसने डॉक्टर्स आणले. एका दिवसाचा बनाव केला गेला. बनावट पाट्या बनवण्यात आल्या. ' आमच्याकडे 110 टिचर्स आहेत. त्यावरील 63 लोक बाहेरुन मागवले आहेत. हे उसने डॉक्टर आहेत. आजच्या दिवसच हे डॉक्टर आहेत. या उसनवारीत डायरेक्टरपासून सचिव प्रशासनातील सर्वच जण मिळून हा बोगस प्रकार करतात ', असं महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेचे सचिव डॉ. औंदुबर म्हस्के यांनी ' आयबीएन लोकमत 'ला सांगितलं. सोलापूरच्या मेडिकल कॉलेजच्या पीएसएम विभागात पाट्यांवरील डॉक्टरांची नावं एका दिवसाकरता आहे. आमच्या टीमनं उसन्या डॉक्टरांची सत्य परिस्थिती उघड करण्यासाठी आत जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा डॉ. जावडेकर यानी आक्षेप घेत कॅमेरा ओढण्याचा प्रयत्न केला. वास्तविक पाहता डॉ. जावडेकर यांचीही पाटी बोगस आहे. त्या याठिकाणी कामच करत नाहीत. त्यांची नेमणूक पुण्याला आहे.सोलापूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये 170 प्राध्यापकांची गरज आहे. सध्या काम 110 प्राध्यापक करतात. त्यातले 52 जण टेम्पररी आहेत आणि आता महाराष्ट्रभरातून 63 डाक्टर्स मागविलेत. केवळ एक दिवसासाठी. या उसनवारीच्या खेळात उच्चस्तरीय समितीचाही सहभाग आहे. उसनवारी हा शब्द आपण शेजार्‍या – पाजर्‍याकडून ऐकावयास मिळतो. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया च्या निरीक्षकांसमोर प्राध्यापकांची संख्या पूर्ण दाखवण्यासाठी चक्क 63 डॅक्टर उसने आणली. जी उद्या इथे दिसणार नाहीत. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या निरीक्षकांसमोर एक दिवसाची हजेरी लावण्यासाठी उसने डॉक्टर आणायची वेळ येणं कॉलेजच्या किती हिताचं आहे, याचा विचार कॉलेजच्या मॅनेजमेंटनं आणि या डॉक्टरांनीही करायला हवा.

close