नर्मदेतली नवी पिढी

November 3, 2010 2:54 PM0 commentsViews: 117

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचं सर्वात दिर्घकाळ चालू असलेलं आंदोलन म्हणून नर्मदा बचाव आंदोलनाकडे पाहिलं जातं.

गुजरातमध्ये नर्मदा नदीवरचा सरदार सरोवर प्रकल्प बांधून पूर्ण होत होता आणि 1986 साली या प्रकल्पामुळे विस्थापित झालेला आदिवासी एकत्र येत होता.

गुजरात, महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या तीन राज्यातला हा आदिवासी. सातपुडा आणि विध्यं पर्वतरांगेच्या कुशीत वर्षानुवर्ष रहात होता.

हळूहळू प्रकल्पग्रस्त म्हणून ओळखला जाऊ लागला. आणि आंदोलक म्हणूनही ओळखला जाऊ लागला. आंदोलन करणार्‍या या आदिवासींचा आणि प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांचा संघर्ष जल, जंगल आणि जमिनीसाठी गेली 25 वर्ष सुरु आहे.

हा संघर्ष नर्मदा घाटीतल्या तीन पिढ्यांनी पाहिला आहे. डुबेंगे पर हटेंगे नही असं म्हणत संघर्ष सुरु केलेल्या नर्मदा बचाव आंदोलनाने पुढे पुनर्वसन आणि विकासाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत केलं.

हा लढा, हा संघर्ष जेव्हा नर्मदा घाटीत सुरु होता तेव्हा एक पिढी मोठी होत होती. आज या नव्या पिढीनेही 25 ओलांडली आहे.

नर्मदेतली ही नवी पिढी काय करतेय, विकासाच्या, पुनर्वसनाच्या मुद्यांकडे कसं पहातेय, स्वत:च्या भविष्याकडे कसं पाहतेय त्याचा मागोवा घेणारा हा रिपोर्ताज.

हा रिपोर्ताज पाहण्यासाठी शेजारच्या व्हिडिओवर क्लिक करा.

close