पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नव्या योजना

December 12, 2008 3:47 PM0 commentsViews: 2

12 डिसेंबर नवी दिल्लीप्रार्थना गहलोत 26/11च्या मुंबईतल्या दहशतवादी हल्ल्यात पंचतारांकित हॉटेल्सना लक्ष्य करण्यातआलं.या हल्ल्यानंतर हॉटेल्स इंडस्ट्रीला येणा-या अडचणी सरकारच्याही लक्षात आल्या आहेत. त्यामुळे या क्षेत्रावरील बोजा कमी करण्यासाठी सरकार पर्यटन आणि हॉटेल्स इंडस्ट्रीवरील लक्झरी टॅक्स कमी करण्याचा विचार करत आहे.मुंबईत झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर एकूणच देशामधलं पर्यटन क्षेत्र धोक्यात आलं आहे. तरीही इथं येऊन राहण्यात आणि फिरण्यात कुठल्याही प्रकारचा धोका नाही असा विश्वास पर्यटकांना देण्याचा प्रयत्न सरकारनं सुरू केला आहे. गेल्यावर्षी याच महिन्यात सुमारे 50,000 विदेशी पर्यटकांनी भारताला भेट दिली होती, पण या वर्षी परिस्थती बदलली आहे.नोव्हेंबर 2007च्या तुलनेत या वर्षी नोव्हेंबरमध्ये भारतात येणा-या विदेशी पर्यटकांच्या संख्येत 3 %नी घट झाली आहे. तर ब-याच पर्यटकांनी डिसेंबरसाठीचं भारतातलं बुकिंग रद्द केलं. अमेरिका, ब्रिटन आणि नेदरलँड या सारख्या काही देशांनी त्यांच्या नागरिकांना भारत पर्यटनासाठी सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिला आहे, मात्र पर्यटकांच्या मनात अजूनही धाकधूक आहे. लवकरच सर्व राज्यांचे पर्यटन मंत्री , पर्यटन आणि हॉटेल इंडस्ट्रीतले प्रमुख उद्योगपती, ट्र्‌व्हल एंजट्स आणि सिक्युअरिटी एजन्सीजची एक तात्काळ बैठक पर्यटन मंत्रालयातर्फे घेण्यात येईल. यावेळी विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी काही नव्या योजना आखल्या जातील.

close