‘ जमात-उल-दावा ‘ च्या 19 ऑफिसला सील

December 12, 2008 3:51 PM0 commentsViews: 2

12 डिसेंबर, दिल्ली संयुक्त राष्ट्रानं ' जमात-उल-दावा ' यां संघटनेवर बंदी घातल्यानंतर पाकिस्ताननं या संघटनेविरुद्ध कारवाई सुरु केली आहे. संपूर्ण पाकिस्तानात ' जमात-उल-दावा ' च्या ऑफिसवर धाडी टाकण्यात येत आहेत. आज जवळपास 19 ऑफिसला सील ठोकण्यात आल्याचं सांगण्यात येतंय तर ' जमात ' चा महत्त्वाचा नेता हाफीज इल सर्दला नजरकैदेत ठेवण्यात आलंय. लाहोरमधील त्याच्या घराला पोलिसांनी वेढा घातलाय तर आणखी सात जणांना अटक करण्याचे आदेश देण्यात आलेत. संघटनेच्या 122 कार्यकर्त्यांना देशाबाहेर जायला मनाई करण्यात आली. तसंच ' जमात-उल-दावा ' ची आणि त्याच्या नेत्यांची सर्व बँक अकांउंट्स गोठवण्यात आलीय. पाकिस्तानचे इंटर्नल अफेअर्स मंत्री रेहमान मलिक यांनी या बातम्यांना दुजोरा दिलाय.

close