भट विरूध्द जोशी

December 2, 2010 5:07 PM0 commentsViews: 43

02 डिसेंबर

अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी आणि सुयोग नाटय्संस्थेचे सर्वेसर्वा सुधीर भट यांच्यात सध्या चांगलीच जुंपली आहे. सहा महिन्यांपूर्वी अमेरिकेत झालेल्या वैश्विक नाट्यसंमेलाआधी सुधीर भट यांनी मोहन जोशी यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांपासून या नाट्याला सुरवात झाली. गेल्या रविवारी मोहन जोशी यांनी आपलं मौन सोडलं आणि सुधीर भटांच्या आरोपांना उत्तरं तर दिलीच पण भटांवर वैयक्तिक हल्लाही चढवला. यानंतर त्यात सुधीर भट तरी कसे मागे राहतील. त्यांनीही बुधवारी मोहन जोशींवर प्रतिहल्ला चढवला. एकमेकांवर चिखलफेक करणारे आणि दुसरीकडे स्वतला सच्चे रंगकर्मी म्हणणारी ही माणसं एकमेकांवर कसे वैयक्तिक टीका करतात.

close