चॅम्पियन्स लीग स्पर्धा रद्द

December 12, 2008 4:47 PM0 commentsViews: 1

12 डिसेंबर भारतीय क्रिकेट टीमचा पाक दौरा रद्द होण्याचे स्पष्ट संकेत मिळत असतानाच यावर्षी होणारी चॅम्पियन्स लीग स्पर्धाही अखेर रद्द झाली आहे. लीगच्या कार्यकारी समितीची महत्त्वाची बैठक कॉन्फरन्स कॉलद्वारा झाली आणि यात हा निर्णय घेण्यात आला.आता चॅम्पियन्स लीग पुढच्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात खेळवण्यात येईल. यापूर्वी, 3 ते 10 डिसेंबर दरम्यान ही स्पर्धा भारतात होणार होती. पण मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली.

close