शीला विरुध्द मुन्नी

December 13, 2010 1:56 PM0 commentsViews: 4

13 डिसेंबर

शीला विरुध्द मुन्नी सध्या हे युद्ध सुरु आहे.आणि हे युद्ध आहे आयटमगर्ल्सचं जे यापूर्वी कधीचं झालं नाही. तीस मार खाँ मधली शीला की जवानी आणि दबंगमधील हिट मुन्नी बदनाम हुई. यामध्ये कोण जास्त फेमस आहे. बॉलिवूडमध्ये कोणाचं राज सुरू आहे. मुन्नी की शीला…?

तिचं नाव आता सगळ्यांनाच माहित झालं आहे. 'माय नेम इझ शीला..' हे आयटम साँग आगामी सिनेमा तिस मार खानच्या प्रमोशनसाठीचं सेट झालं नसून यार्षातल्या बेस्ट आयटम साँग मुन्नी बदनामला आव्हान ठरू शकतं.

मी या आधीदेखील आयटम साँग केलेत पण लोकांना हे जास्त आवडल आहे असं मत केतरिना कैफनी व्यक्त केलं. तरमलायका अरोरा खान म्हणते की, फराहबरोबर मी तिसर्‍यांदा काम करतेय आणि सगळ्यांना ते आवडतं त्यामुळे मी खूप खूश आहे.

खरतर हे दोन्ही डान्स परफॉर्मन्स फराह खानने कोरिओग्राफ केले. पण मुन्नी हे थोडं टपोरी गाणं असून असून शीला स्टायलीश आणि क्लासी आहे. त्यामुळे या दोन गाण्यांविषयी ठरवणं थोडं कठीण होईल. ही दोन्ही गाणी फराहचीच असल्यामुळे तिची द्विधा मन:स्थिती झाली. पण ऑनलाईनवर शीलाला अधिक पसंती मिळाली.

फेसबुकवर शीला की जवानी या गाण्याचे 12 हजार आठशे पाच फॅन्स आहेत. तर मुन्नी बदनाम हुई या गाण्याचे तीन हजार बेचाळीस फॅन्स आहेत. तर ट्विटरवरसुद्धा "अगर शीला कुछ दिन पेहले जवान होती अगर शीला कुछ दिन पेहले जवान होती तो मुन्नी थोडी कम बदनाम होती अशा वाक्यांची चर्चा सुरू आहे.

close