सचिनच्या इंग्लंडविरुद्ध 2000 रन्स पूर्ण

December 12, 2008 3:36 PM0 commentsViews: 3

12 डिसेंबर चेन्नई चेन्नईला सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताची सुरुवात खराब झाली. पण असं असलं तरी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं मात्र पुन्हा एकदा संपूर्ण क्रिकेट जगताचं लक्ष आपल्याकडे वळवलंय. इंग्लंडविरुध्द टेस्टमध्ये सचिन तेंडुलकरनं 2 हजार रन्सचा टप्पा पूर्ण केलाय. हा टप्पा पूर्ण करण्यासाठी चेन्नई टेस्टमध्ये सचिनला अवघ्या 6 रन्सची आवश्यकता होती. सचिन 37 रन्सवर आऊट झाला. इंग्लंडविरुद्ध सचिननं फक्त 23 मॅचमध्ये 2000 रन्स पूर्ण केले. यात त्यानं 6 सेंच्युरी आणि 10 हाफ सेंच्युरी ठोकत 2031 रन्स केले आहेत. त्याचा सर्वोत्तम स्कोर आहे तो 193 रन्स.

close