लवासात काही चुका झाल्या असतील तर दुरुस्त करा – शरद पवार

December 19, 2010 5:10 PM0 commentsViews: 6

19 डिसेंबर

इंग्लंडप्रमाणे महाराष्ट्रातही लेक डिस्ट्रीक्ट किंवा हिल सिटी तयार होऊ शकते या विचारातूनच लवासा साकार झालं. पर्यटनाला चालना देण्यासाठी आपण मुख्यमंत्री असताना लवासाची निर्मिती कशा पद्धतीने होऊ शकते याबाबत आमदारांची एक समिती नेमली होती असं स्पष्टीकरण केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केलं. तसेच लवासा प्रकल्प उभारतांना काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त झाल्या पाहिजे. लवासासारखे प्रकल्प राज्याच्या प्रगतीसाठी आवश्यक असल्याचे मतही त्यांनी आयबीएन-लोकमतला दिलेल्या एक्सक्लुजीव्ह मुलाखतीत व्यक्त केलं.

ऊसाच्या प्रश्नावर लवकरच तोडगा ; जैतापूर प्रकल्पाची आवश्यकता

महाराष्ट्रात ऊसाला सगळ्यात जास्त भाव मिळतो असा दावा केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केला. तर दूसरीकडे ऊसाच्या पहिला हप्ता 2200 रुपये मिळावायासाठी राज्य भरात ऊस शेतकर्‍यानी आणि शेतकरी संघटनानी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. या आंदोलनावर राज्य सरकार, ऊस आंदोलक आणि कारखानदारांमध्ये योग्य ती चर्चा होऊन लवकरच तोडगा काढला जाईल असा विश्वासही पवारांनी व्यक्त केला. तसेच जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबद्दल पवार म्हणता की, महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत मागे पडला. विकास अपेक्षित असेल तर वीज निर्मिती गरजेची आहे. त्यासाठी जैतापूरसारख्या प्रकल्पाची गरज आहे. पण प्रकल्पग्रस्तांचे योग्य पुनर्वसन झालंच पाहिजे असंही त्यांनी ठासून सांगितलं.

close