धोणीकडून आनंदला हि-याची अंगठी भेट

December 12, 2008 5:15 PM0 commentsViews: 7

12 डिसेंबर महेंद्रसिंग धोणी आणि विश्वनाथन आनंद भारतीय क्रीडा जगतातील दोन बेताज बादशाह. एक क्रिकेटमधला महाराजा तर दुसरा बुद्धीबळातल्या 64 घरांचा राजा. हे दोघंही काल एकत्र आले. निमित्त होतं ऑल इंडिया चेस फेडरेशननं आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाचं.वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंदनं गुरुवारी आपला 39वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या वाढदिवसानिमित्तानं ऑल इंडिया चेस फेडरेशनने एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. आणि या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली ती भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन महेंद्र सिंग धोणीनं. याप्रसंगी धोणीनं आनंदला जवळ जवळ पाच लाख रुपयांची हि-याची अंगठी भेट दिली. ऑल इंडिया चेस फेडरेशनचे अध्यक्ष एन श्रीनिवासन हे बीसीसीआयचेही सचिव आहेत त्यामुळे त्यांनीच क्रिकेटर्स आणि आनंदच्या भेटीचा हा योग जुळवून आणला होता. गेल्याच महिन्यात ग्रँडमास्टर ब्लादिमीर क्रामनिकला नमवत सलग दुस-यांदा वर्ल्ड चॅम्पियनशिप आपल्या नावावर करणा-या आनंदसाठीही ही एक अविस्मरणीय भेट ठरली.

close