साहित्य संमेलनात राजकारणी अस्पृश्य नाहीत -उत्तम कांबळे

December 23, 2010 2:24 PM0 commentsViews: 6

23 डिसेंबर

साहित्यिकांना राजकारण आणि राजकारणी अस्पृश्य असू नये असं मत ठाण्यात होणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी व्यक्त केलं. राजकारणापासून दूर राहण्याच्या मानसिकतेमुळेच मराठी साहित्यात राजकीय कादंबर्‍या, कविता, पुस्तक पुरेशा प्रमाणात निर्माण होऊ शकले नाही असंही ते म्हणाले. आयबीएन लोकमतला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

साहित्य संमेलनात होणारी उधळपट्टी टाळून संमेलन साधेपणाने करावे अशी अपेक्षाही उत्तम कांबळे यांनी व्यक्त केली. हा खर्च टाळून तो साहित्यिकांच्या आरोग्य आणि पुस्तकांवर केला पाहिजे असंही ते म्हणाले.

close