बॉक्सिंग वर्ल्डकपमध्ये भारतीय बॉक्सर्सची आगेकूच

December 12, 2008 4:51 PM0 commentsViews: 1

12 डिसेंबर मॉस्को रशियात मॉस्को इथं सुरू असलेल्या बॉक्सिंग वर्ल्डकपमध्ये चार भारतीय बॉक्सर्सनी सेमी फायनलपर्यंत धडक मारली आहे.51 किलो वजनी गटाच्या क्वार्टर फायनलमध्ये जितेंदर कुमारने जो गेजचा 18 विरुद्ध 6 पॉइंट्सनी पराभव केला. आता सेमी फायनलमध्ये त्याची गाठ क्युबाच्या हर्नांडेझ लफिताशी पडणार आहे. भारताचा आणखी एक बॉक्सर लाकराला 57 किलो वजनी गटात क्वार्टर फायनलमध्ये पुढे चाल मिळाली आहे.अखिल कुमार आणि दिनेश कुमार या भारताच्या इतर दोन बॉक्सर्सनी यापूर्वीच सेमी फायनल गाठली. शनिवारपासून सेमी फायनल राऊंड्स सुरु होणार आहेत.

close