काश्मीरमध्ये शनिवारी पाचव्या टप्प्यातलं मतदान

December 13, 2008 5:55 AM0 commentsViews: 2

13 जिसेंबर, काश्मीरजम्मू आणि काश्मीरमधल्या निवडणुकांमध्ये शनिवारी पाचव्या टप्प्यातलं मतदान होत आहे. या टप्प्यामधे 11 मतदार संघांतील सुमारे साडेआठ लाख मतदार आहेत. कथूआ, हिरानगर या जम्मूतल्या महत्त्वाच्या भागांसह दक्षिण काश्मीरमधल्या सहा मतदारसंघांमधेही आज मतदान होतंय. इथ मेहबुबा मुफ्तींच्या पीडीपीचं प्राबल्य आहे. मात्र यावेळी नॅशनल कान्फरन्सही चांगल्याच तयारीत आहे. जम्मूमध्ये अनेक भागातून काँग्रेसलाही चांगल मतदान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ला आणि पाच राज्यांतल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर जम्मू आणि काश्मीरमधल्या मतदानाबद्दल आता उत्सुकता आहे.

close