विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी चोख बंदोबस्त

December 13, 2008 6:09 AM0 commentsViews: 7

13 डिसेंबर, नागपूरप्रशांत कोरटकरअनेक महत्त्वपर्ण घडामोडींनंतर महाराष्ट्र विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या 15 तारखेपासून नागपुरात सुरू होत आहे. त्यासाठी सगळी तयारी पूर्ण झाली आहे. मुंबईतल्या हल्ल्याची घटना लक्षात घेता, विधानभवन परिसरात आणि आसपास कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली आहे. नागपूरच्या सिव्हील लाईन्स भागातील विधानसभा इमारतीच्या परिसरात हिवाळी अधिवेशानाची लगबग सुरू झालीये. दोन दिवसांवर अधिवेशन येऊन पोहचल्या मुळे सर्वच कामांना गती आलीय. नवीन पाट्या , रंगवलेले रस्ते, कामाची लगबग यामुळे हिवाळी अधिवेशनाची चाहूल जाणवू लागली आहे. विधानभवन परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने काटेकोर नियम करण्यात आले आहेत. त्यासाठी राज्यभरातून पोलीस इथ तळ ठोकून बसले आहेत. सुरक्षेसाठी एक हजारावर पोलीस अधिकारी, सहा हजार पोलीस कर्मचारी आणि राज्य राखीव दलाचे जवान तैनात आहेत. विधानभवनाच्या आत-बाहेर सी.सी टीव्ही कॅ मेरे बसवण्यात आले आहेत. दहशतवाद या मुख्य मुद्द्याबरोबरच इतरही अनेक महत्वाच्या मुद्यांवर वादळी चर्चा होण्याची चिन्ह आहेत. लोडशेडिंग, पीक परिस्थिती यासह अनेक मुद्द्यांना स्पर्श करणार्‍या 2 हजार 629 लक्षवेधी यंदा दोन्ही सभागृहात आल्या आहेत. अशोक चव्हाणांच्या नव्या मंत्र्यांना आता विरोधकांना तोंड द्यावं लागणार आहे. पण यंदा तरी विधिमंडळात सरकार आणि विरोधकांकडून जबाबदारीनं काम व्हाव हीच सामान्यांची अपेक्षा आहे.

close