कोण आहे गॉडफादर ?

January 27, 2011 5:35 PM0 commentsViews: 2

27 जानेवारी

प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी लोकशाहीला आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना नाशिक जिल्ह्यातल्या मनमाडमध्ये घडली. नाशिकचे अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना पेट्रोलच्या भेसळखोर माफियांनी जिवंत जाळलं. या घटनेत अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांचा जागीच मृत्यू झाला.

माणूसकीला काळीमा फासणार्‍या या घटनेनंतर अवघ्या 36 तासात सर्व अकरा आरोपींना अटक करण्यात पोलीस यंत्रणेला यश आलं. मात्र या सर्व प्रकरणामागे 'गॉडफादर कोण आहे' याचा शोध घेतला जातं आहे. या सर्व प्रकरणावर प्रकाश टाकणारा हा विशेष कार्यक्रम..कोण आहे गॉडफादर ?

close