विंध्यगिरी आणि एम व्ही नॉर्डलेक या जहाजांची टक्कर

February 1, 2011 4:45 PM0 commentsViews: 2

01 फेब्रुवारी

भारताची युद्धनौका आयएनएस विंध्यगिरीला मुंबईच्या समुद्रात सोमवारी जलसमाधी मिळाली. त्यापूर्वी रविवारी त्याची एम.व्ही नॉर्डलेक या मालवाहू जहाजाशी टक्कर झाली होती. या जहाजांची टक्कर कशी झाली होती त्याचे हे एक्सक्लुझिव्ह फूटेज आहे. या टक्करीनंतर विंध्यगिरीवर असलेल्या लोकांमध्ये एकचं गोधळ उडाला होता.तर टक्करीनंतर विंध्यगिरीला आग लागली होती.

भारताची युद्धनौका आयएनएस विंध्यगिरीला जलसमाधी मिळाली. विंध्यगिरी ही महत्त्वाची युद्धनौका 90 टक्के बुडाली आहे. रविवारी दुपारी विंध्यगिरीची एम. व्ही नॉर्डलेक या मालवाहू जहाजाशी टक्कर झाली होती. त्यानंतर विंध्यगिरीतल्या बॉयलरला आग लागली होती. ही आग विझवण्यासाठी फायर ब्रिगेडच्या आणि नौदलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. पण त्यांना अपयश आलं. यासोबतच विंध्यगिरीवर मोठ्या प्रमाणात तेलाचा साठा होता. तो काढण्यासाठी नौदलानं केलेले प्रयत्नही यशस्वी झाले नाहीत. अखेर आग विझवण्याचे प्रयत्न थांबवण्यात आले. विंध्यगिरी जिथं बुडाली तिथे समुद्राची खोली 7 मीटर आहे आणि समुद्राच्या तळाला लागून विंध्यगिरी एका बाजूला कलंडली. आता याप्रकरणी जहाज मंत्रालयानं चौकशीचे आदेश दिलेत. तर नौदलानं चौकशी समिती स्थापन केली आहे.

close