सीएसटीवरील अनेक कॅमेरे नादुरुस्त

December 13, 2008 7:06 AM0 commentsViews: 7

13 डिसेंबर, मुंबईअजित मांढरे सुरक्षेच्या कारणास्तव सीएसटी स्टेशनवर बसवण्यात आलेल्या 38 सीसीटीव्ही कॅमेर्‍यांपैकी अनेक कॅमेरे नादुरूस्त असल्याची धक्कादायक माहिती आयबीएन लोकमतला मिळाली आहे. वेळोवेळी या कॅमेर्‍यांची देखभाल केली गेली नाही, त्यामुळं त्यांची ही अवस्था झालीय.सी.एस.टी रेल्वे स्थानकार एकूण 38 सी.सी.टिव्ही कॅमेरे बसवले आहेत. यातील 16 कॅमेरे मेन लाईनवर आणि 22 कॅमेरे लोकल लाईनवर आहेच. या सर्वांचं कंट्रोल आर.पी.एफच्या हातात असतं. तब्बल 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ अतिरेक्यांनी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 8,9,10,11,12 आणि 13 वर हैदोस घातला. पण, तरीही त्यांना टार्गेट करण्यात रेल्वे पोलिसांना अपयश आलं. त्यामुळं अनेक निरपराध नागरिक मारले गेले. जर हे कॅमेरे चालू असते, तर अतिरेक्यांची पोझिशन जाणून घेऊन त्यांना ठार करणं शक्य झालं असतं. "सीएसटीवरचे बहुतेक कॅमेरे बंद होते. जे चालू होते, त्यातल्याही काही कॅमेरातून धुसर चित्र दिसत होतं" असं लोहमार्ग पोलीस आयुक्त अशोक शर्मा यांनी सांगितलं.करोडो रूपये खर्च करून रेल्वे प्रशासनाने हे सी.सी.टिव्ही कॅमेर बसवले आहेत. मात्र ऐन संकटाच्या वेळीच ह्या कॅमेर्‍यांनी दगा दिला आणि तेही अधिकार्‍यांच्या निष्काळजी पणामुळे. आणि त्यामुळे ह्या तीन अधिकार्‍यांचा बळी गेला. या ठिकाणी आरपीएफच्या प्रमुखासाठी एके-47 धारक संरक्षक असतात…हेड क्वाटर असल्यामुळं याठिकाणी अत्याधुनिक हत्यारांचा मोठा साठाही आहे…आणि जर आरपीएफनं मनावर घेतलं असतं तर त्या अतिरेक्यांना रेल्वे स्थानकातच गोळ्या घालून ठार करता आलं असतं. पण, उपलब्ध यंत्रणेचा योग्य वापर न केल्यानं अतिरेकी आपलं काम करून छाती ठोकत रेल्वे स्थानकाच्या बाहेर पडले आणि जे काही घडलं ते सर्वांनीच पाहिलं. यानंतर तरी हे कॅमेरेदुरुस्त होतील का ? आणि भविष्यातील संकटांना तोंड देऊ शकतील का ? हाच प्रश्न आता विचारला जात आहे.

close