‘कुणी केली दमदाटी ?’

March 1, 2011 4:53 PM0 commentsViews: 6

01 मार्च

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जैतापूर दौर्‍यावर असताना प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधण्यासाठी मेळावा घेण्यात आला होता. या मेळाव्यात आमदार राजन साळवींना दमदाटी केली नाही तर त्यांनी शासनाला अपशब्द वापरू नये एवढंच मी त्या दिवशी म्हटलं असं स्पष्टीकरण नारायण राणे यांनी दिलं आहे. तर राजन साळवींना दमदाटी केली म्हणून उद्धव ठाकरे कोकणात येणार असतील तर त्यांनी जरूर यावे. त्यांच्या स्वागताला मी उपस्थित राहीन असं आव्हान नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना दिलं आहे. आयबीएन लोकमतला दिलेल्या खास मुलाखतीत ते बोलत होते.

close