संसदेवरील हल्ल्याचा राजकारण्यांना विसर

December 13, 2008 8:29 AM0 commentsViews: 8

13 डिसेंबर, दिल्ली संसदेवर अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याला 7 वर्ष पूर्ण झाली. संसदेवरील हल्ला हा भारतीय लोकशाहीवरील एक मोठा आघात आहे. पण राजकारण्यांना त्याबद्दल काहीही वाटत नसल्याचं स्पष्ट झालंय. संसदेवरच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला फक्त 10 खासदारच हजर राहिले. 2001 साली हिवाळी अधिवेशन सुरू असताना अतिरेक्यांनी संसदेवर हल्ला केला होता. हा हल्ला झाला, त्यावेळेस अनेक संसद सदस्य संसदेत हजर होते. पाच पोलीस अधिकारी आणि संसदेतील एका सुरक्षारक्षकाच्या प्रणाची किंमत देऊन बहादूर सुरक्षारक्षकांनी हा हल्ला परतवून लावला होता. मात्र या बलिदानाचा आज राजकरण्यांना विसर पडल्याचं स्पष्ट झालं आहे.

close