रिपोर्ताज : कोल्हापूरच्या लेकी

March 18, 2011 2:52 PM0 commentsViews: 81

सधन अशा या पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूरच्या लेकी कमी झाल्या. याचं कारण होतं गर्भालिंग चाचणी. आणि त्यानुसार केलेली गर्भलिंग निवड. गेल्या दशकाच्या सुरुवातीला म्हणजे 2001 मध्ये हे प्रमाण 1000 मुलांमागे 839 मुली इतकं घसरलं. आणि धोक्याची घंटा वाजली. पुरोगामी योजनांची मांदीयाळी असणार्‍या या जिल्ह्यात प्रयत्न सुरु झाले. पण सगळ्यात महत्वाचं आणि महत्वाकांक्षी अभियान सुरु झालं ते 2009 मध्ये. सेव्ह द बेबी गर्ल नावाने. कोल्हापूरच्या या मॉडेलकडे मोठ्या आशेने पाहिलं जातंय. त्यासाठी ऑनलाईन आणि डिजिटल टेक्नॉलॉजी वापरली गेली. गेले दीड वर्ष राबवत असलेल्या या टेक्नॉलॉजीकडे मूळात गांभिर्याने पाहण्याची गरज आहे. लांबलेल्या कारवाया, बेकायदेशीर डॉक्टरांचा आणि सोनोग्राफी सेंटर्सचा सुळसुळाट या सेव्ह द बेबी कॅम्पेनसमोरच्या मोठ्या समस्या आहेत. कोल्हापूरच्या या मॉडेलकडे प्रयोग म्हणून पाहीलं तर आता कुठे सुरुवात होतेय.

close