भिल्लांच्या देशात…

March 22, 2011 12:51 PM0 commentsViews: 38

महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजराथच्या सीमांवर पसरलेल्या पसरलेल्या सातपुडा पर्वताच्या रांगा… इथे हजारो वर्षांपासून नांदत आलेली भिल्ल आदिवासींची जमात एका आदिम संस्कृतीचा खजिना आहे. इतर आदिवासींप्रमाणे भिल्ल होळीला देवता मानतात. त्यामुळे होळी साजरी करणं म्हृणजे भिल्लांसाठी जगण्याचा उत्सव असतो. पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेल्या परंपरा जोपासत भिल्ल या उत्सवात सहभागी होतो… निसर्गाची पूजा करतो आणि घरा-गावच्या सुखसमृद्धीची होळीमातेकडे मागणी करतो. आजही मुख्यप्रवाहापासून दूर असणारा हा आदिवासी लोककला जपतोय. त्यांची भाषा, त्यांच्या चालीरिती, रूढी-परंपरा, आणि काळानुसार बदललेलं जगणं टिपण्याचा प्रयत्न म्हणजे भिल्लांच्या देशांत !

close