मुंबईत पार पडली ब्रेल रीडिंगची स्पर्धा

December 13, 2008 10:32 AM0 commentsViews: 8

13 डिसेंबर मुंबईशिल्पा गाडआपल्या आजूबाजूला अनेक स्पर्धा होत असतात. पण मुंबईत आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या ब्रेल रीडिंगची स्पर्धा झाली.ब्रेलची लिपी सहा ठिपक्यांची असते. त्यातून 63 अक्षरं तयार होतात. ब्रेलमध्ये जगातली कुठलीही भाषा लिहिता येते. आणि त्याचं श्रेय जातं लुई ब्रेल यांना. लुई ब्रेलनं 1856 मध्ये ब्रेल लिपी शोधली. या लुई ब्रेल यांना यावर्षी 200वर्ष पूर्ण झाली. ही तीच व्यक्ती आहे जिनं या सगळ्यांना ज्ञानाचा प्रकाश दाखवला.मुंबईतील या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धेत देशभरातून पाचशेहून अधिक मुलं सहभागी झाली होती. आणि त्यांना एकत्र आणलं नॅबच्या मुंबई शाखेनं.आम्हाला जवळपास 10 ते 12 लाख रुपयांचा खर्च आला. यात बाहेरून आलेल्या मुलांचा रहाण्याचा खर्च त्यांचं जेवणखाणं सगळ्यांचा समावेश आहे. पण मुलांच्या प्रगतीच्या हेतुनं आम्ही ही स्पर्धा घेतली असं नॅबचे अधिकारी सांगतात.स्पर्धा तर खूप असतात. पण ही स्पर्धा वेगळी आहे. कारण अशा स्पर्धा अंध मुलांना डोळसपणे पाहायला आणि जगायला शिकवतात.

close