ग्रेट भेट : मुंबईचे डबेवाले

April 1, 2011 11:03 AM0 commentsViews: 174

आतापर्यत ग्रेट भेटच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपला वैशिष्ठ्यपूर्ण ठसा उमटवणारी कतृत्ववान माणसं प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. गेल्या तीन वर्षांमध्ये अशी 99 व्यक्तिमत्वांच्या मुलाखती या कार्यक्रमातून रंगल्या. ही सगळी व्यक्तिमत्वं सामान्य माणसाशी नातं सांगणारी होती. म्हणूनच शंभरावी ग्रेट भेट स्पेशल होती. ही ग्रेट भेट होती मॅनेजमेंट गुरु मुंबईचे जगप्रसिध्द डब्बेवाले यांच्यासोबत. डबेवाल्यांची ही कहाणी उलगडून सांगितली ती नूतन टिफिन बॉक्स संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ मेदगे आणि डबेवाले वाहतूक संघाचे अध्यक्ष सोपान मरे यांनी. शिवाय काही डबेवालेही या कार्यक्रमात सहभागी झाले होते. मुंबईचा डब्बेवाला हा मंुबई पुरता मर्यदित नाही, तो थेट लंडनच्या राजवाड्यात जाऊन पोहचला. पण हे डब्बेवाले नुसती माणसं नाहीत, नुसती संस्था नाही तर डब्बेवाले म्हणजे निष्ठा, प्रामाणिकपणा आणि कार्यक्षमता, असं म्हटलं जातं. या सुवर्ण महोत्सवी ग्रेट भेट मध्ये या डब्बेवाल्यांच्या संस्थेचा इतिहास जाणून घेतला गेला.

close