भारतात लवकरच थ्री-जी टेक्नॉलॉजी

December 13, 2008 11:02 AM0 commentsViews: 12

13 डिसेंबरमोबाईलमध्ये थ्री-जी सेवा देण्यासाठी टेलीकॉम कंपन्यांमध्ये थ्री-जी स्पेक्ट्रमची बोली येत्या सोमवारी लागणार आहे. दूरसंचार खात्याने दिलेल्या माहितीप्रमाणे या लिलावात परदेशी कंपन्यांही सहभागी होऊ शकतात आणि त्यासाठी त्यांना भारतीय कंपन्याशी संलग्न असण्याची गरज नाही. दिल्लीमध्ये दोन आणि मुंबई तसंच कोलकात्यात चार खासगी टेलीकॉम ऑपरेटर्सना थ्री-जी सेवा देण्याची मंजूरी मिळू शकते. हा लिलाव पूर्ण झाल्यानंतर कंपन्यांना लायसन्स फीपैकी पंचवीस टक्के रक्कम पाच दिवसात सरकारकडे भरायची आहे, तर बाकी रक्कम दहा दिवसात चुकती करावी लागेल.थ्री-जी म्हणजे थर्ड जनरेशन मोबाईल टेक्नॉलॉजी. हाय स्पीड इंटरनेट सेवा हे थ्री-जी सेवेचं वैशिष्ट्य आहे. व्हिडिओ कॉलिंग, हाय स्पीड डेटा ट्रान्स्फर, हाय रेझोल्यूशन व्हिडिओ आणि मल्टिमीडिया असे अनेक फायदे थ्री-जीमुळे मिळवता येऊ शकतील.भारतात याआधीच अ‍ॅपलच्या 'आय-फोन' मध्ये ही टेक्नॉलॉजी उपलब्ध असली तरही सेवा पुरवण्याची भारतात कोणत्याही मोबाईल कंपनीला परवानगी नव्हती. मात्र लवकरच थ्री-जी टेक्नॉलॉजीचे सगळे फायदे भारतात उपलब्ध होतील.

close