ताज पॅलेस 21 डिसेंबरला खुलं होणार

December 13, 2008 11:14 AM0 commentsViews: 5

13 डिसेंबर मुंबईदहशतवादी हल्ल्यात होरपळलेलं ताज पॅलेस येत्या 21 डिसेंबरला पर्यटकांसाठी पुन्हा खुलं होणार आहे. ताजच्या व्यवस्थापनाने ही घोषणा केली आहे. तर ताजची हेरिटेज विंग सर्वांसाठी खुली होण्यासाठी 3 ते 4 महिने लागणार आहेत. 26/11ला दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला. त्यावेळी त्यांनी ताज आणि ट्रायडंट म्हणजे पूर्वीच्या ओबेरॉय हॉटेलवर दहशतवाद्यांनी हल्ला चढवला होता. ज्यात अनेक निरपराधांचा बळी गेला होता. ही दोन्ही पंचतारांकित हॉटेल्स सुरू होण्यासाठी कमीत कमी सहा महिने लागतील असा अंदाज बांधला जात होता, पण त्यापूर्वीच दहशतवादाच्या सर्व आठवणी पुसून टाकत ताज पुन्हा उभं राहतंय.

close