‘मिस वर्ल्ड’ मध्ये भारताची पार्वती

December 13, 2008 11:34 AM0 commentsViews: 4

13 डिसेंबरमिस वर्ल्ड निवडण्यासाठी दक्षिण अफ्रिकेची राजधानी जोहान्सबर्गमध्ये शनिवारी स्पर्धा रंगणार आहे. संपूर्ण जगातून 108 स्पर्धक सहभागी झालेल्या या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणारी पार्वती ओमनाकुट्टनकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. 5 फूट 9 इंच उंचीची पार्वती मुळची केरळची आहे. वयाच्या 21 व्या वर्षी एप्रिलमध्ये झालेल्या फेमिना मिस इंडिया या स्पर्धेचा किताब जिंकून ती या 58 व्या मिस वर्ल्ड स्पर्धेचा किताब पटकावण्यास सज्ज झाली आहे. या स्पर्धेत विजेतेपद पटकावण्याचा पार्वतीचा निर्धार आहे. "मिस इंडिया स्पर्धा जिंकल्यापासून सगळ्या देशाच्या माझ्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. या सगळ्या आशा पूर्ण करण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन" असं ती म्हणाली.यापूर्वी रिटा फारिया (1966), ऐश्वर्या राय-बच्चन (1994) , डायना हेडन (1997) , युक्ता मुखी (1999) आणि प्रियांका चोप्रा (2000) या भारतीय सुंदरींनी हा किताब पटकवला आहे. आता पार्वती देखील या पंक्तीत जागा मिळवते का ? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

close