मेरे वतन के लोगों…

March 17, 2012 2:50 PM0 commentsViews: 4

यंदा सचिनला त्याचा वाढदिवस क्रिकेटच्या मैदानावर साजरा करावा लागणार आहे. हैदराबादमध्ये सचिन आयपीएलची मॅच खेळणार आहे. पण त्यातही वेळ काढून सचिननं आपला वाढदिवस आयबीएन लोकमतसह साजरा केला. आयबीएन लोकमतच्या माध्यमातून सचिननं पुण्यातल्या खडकीमधील पॅराप्लेजिक रिहॅब सेंटरमधील जवानांबरोबर आपला हा वाढदिवस साजरा केला. वाढदिवशी भेट स्वीकारण्याचा प्रघात आहे. पण सचिननं या सेंटरमधील जवानांनाच अनोखी भेट दिली. जग जिंकणार्‍या सचिनने आपल्या साधे सरळपणाने अपंगत्व नशिबी आलेल्या जवानांची मनं जिंकली. शरीराने अपंग असली तरी या जवानात नवी उमेद निर्माण करण्याची किमया सचिनने केली.

close