गोरेगावमधील अनाधिकृत झोपड्यांवर पालिकेची कारवाई

December 13, 2008 1:13 PM0 commentsViews: 3

13 डिसेंबर, मुंबई गोरेगाव – लिंक रोडवरील शांतीनगर आणि मोतीलाल नगरमधील सुमारे 60 अनधिकृत झोपड्यांवर महापालिकेनं कारवाई केलीय. म्हाडाच्या जमिनीवर उभारण्यात आलेल्या या झोपड्‌यांवर यापूर्वीही कारवाई करण्यात आली होती. मात्र तरीही प्रशासनाच्या आशिर्वादानं या झोपड्या पुन्हा उभ्या राहिल्यात. खाजगी सुरक्षारक्षकांच्या माध्यमातून या जागेवर लक्ष ठेवण्यात येईल, असं पालिकेनं स्पष्ट केलंय. गेल्या दोन दिवसांपासून गोरेगाव परिसरात ही कारवाई सुरू केलीय.

close