रिपोर्ताज : लाखो कातकर्‍यांची गोष्ट

April 30, 2011 5:38 PM0 commentsViews: 21

खैराच्या झाडापासून कात बनवण्याचा त्यांचा पारंपरिक व्यवसाय म्हणून ते कातकरी. आदिम समूहांपैकी असणारी एक जमात ती ही कातकरी. कात करण्याचा या आदिवासींचा व्यवसाय कधीच मागे पडला आहे. आज त्यांच्या वाट्याला आली आहे मोलमजुरी, स्थलांतर आणि जगण्याची लढाई. आज सर्वात मागास राहिलेली आदिवासी जमात म्हणून यांच्याकडे पाहिलं जातंय. नुकत्याच झालेल्या भारताच्या जनगणनेत या जमातीच्या इत्यंभूत माहितीची नोंद झालीय. या जनगणनेमुळे आकडेवारीसह त्यांचे प्रश्न पुन्हा एकदा लोकांच्या समोर येतील. कारण या वस्त्यांची पहिल्यांदाच व्यवस्थित जनगणना झाली आहे. हा आदिवासींच जीवनमानावर नजर टाकणारा हा रिपोर्ताज

close