लादेनचा खातमा..

May 2, 2011 2:20 PM0 commentsViews: 4

02 मे

अफगणिस्तानपासून 120 मैल अंतरावर ही जागा आहे. ओसामा या ठिकाणी अनेकदा लपून राहत असे. ही जागा उत्तर इस्लाबादपासून 30 मैल अंतरावर आहे. याच ठिकाणी ओसामा बिन लादेन गेल्या काही वर्षापासून राहत होता. आणि याच ठिकाणी त्याचा मृत्यू झाला आहे. या जागेवरच सीआयएने कारवाई केली आणि 40 मिनिटं झालेल्या धुमश्चक्रीमध्ये लादेन ठार झाला. ज्या ठिकाणी लादेन राहत होता.ती बिल्डिंग अतिशय पॉश अशा भागात आहे. इथं पाकिस्ताननमधील निवृत्त लष्करी अधिकारी राहतात. या बिल्डिंगबद्दल संशय वाढण्याचे कारण म्हणजे इथं टेलिफोनचीसुद्धा सोय नाही आणि इंटरनेट कनेक्शनही नाही. येथील कचराही फेकून देण्याऐवजी जाळून टाकला जातो.

close