गर्जा महाराष्ट्र : जे जे हॉस्पिटल

May 11, 2011 2:04 PM0 commentsViews: 5

राज्याला वेगवेगळ्या क्षेत्रात सक्षम बनवण्यात मुंबईचा वाटा कोणीच नाकारणार नाही. अर्थात हे सहजशक्य झालं ते मुंबईतल्या अनेक सुविधांमुळे. आणि त्यातलीच एक सुविधा होती ती रुग्णालयांची. महाराष्ट्रातलं पहिलं आणि देशातलं दुसरं मेडिकल कॉलेज जे सुरू झालं होतं १६५ वर्षांपूर्वी. ते म्हणजे मुंबईतील जेजे हॉस्पिटल.

1834 मध्ये मुंबईचे तत्कालिन गव्हर्नर सर रॉबर्ट ग्रँट यांना मुंबईत वैद्यकीय महाविद्यालयाची आणि रुग्णालयाची आवश्यकता जाणवली. सर जमशेदजी जीजीभॉय यांनी त्यासाठी एक लाख रुपयाची देणगी दिली. 18 जुलै 1838 ला ब्रिटीश सरकारकडून वैद्यकीय महाविद्यालयासाठी मान्यता मिळाल्याचं पत्र आलं. पण त्याआधी नऊ दिवसांपूर्वीच सर रॉबर्ट ग्रांट यांचं निधन झालं होतं. मग त्यांचंच नाव या विद्यालयाला देण्यात आलं. भाऊ दाजी लाड हे ग्रांट मेडिकल कॉलेजच्या पहिल्या बॅचच्या पहिल्या नऊ विद्यार्थ्यांमधील एक. त्या जोडीनेच १५ मे १८४५ ला जेजे हॉस्पिटलही जमशेदजींच्या देणगीतून उभं राहिलं.

close