वामनदादा कर्डक यांच्या स्मृतींचा महापालिकेला पडला विसर

May 16, 2011 6:31 PM0 commentsViews: 43

16 मे

लोककवी वामनदादा कर्डक यांच्या स्मृतींचा नाशिक महापालिकेला विसर पडला आहे. महापालिकेने उभारलेल्या वामनदादा कर्डक स्मारकाची पुरती वाताहत झाली. उखडलेल्या फरशा, उडालेले पत्रे, आणि दारुच्या बाटल्या अशी विदारक परिस्थिती सध्या या स्मारकाच्या परिसरात आहे. वामनदादांच्या स्मरकाची उभारणी नाशिक महापालिकेच्या वतीने करण्यात आली. मात्र या स्मारकाकडे प्रशासनाने पाठ फिरवल्यामुळे स्मारकाची ही अवस्था झाली आहे. स्मारकाच्या या अवस्थेबद्दल स्थानिकांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

close