मानवतेचं मूल्य जपा – गायक हरिहरन

December 13, 2008 1:46 PM0 commentsViews: 13

13 डिसेंबर, कल्याण" मुंबईवर जे दहशतवादी हल्ला आहे, त्याचा विचार सगळ्यांनी करायला पाहिजे. राष्ट्रपती ते सर्वसामान्य माणूस यांच्यामधली प्रत्येक माणसाच्या जिवाची किंमत ती काय आहे याचा विचार करायला हवा. याचा विचार व्हायला पाहिजे," असं प्रसिद्ध गायक हरिहरन मत आहे. कल्याणमध्ये सुरू असलेल्या देव गंधर्व महोत्सवात या महोत्सवात प्रसिद्ध गायक हरिहरन यांची गझल कॉन्सर्ट झाली. त्यांच्या गझल ऐकुन रसिकही तृप्त झाले. त्यावेळी ते मुंबईतल्या दहशतवादावरही बोलले. त्यावेळी त्यांनी मानवतेचं मूल्य जपण्याचा संदेश दिला. " भारतामध्ये आज निरनिराळ्या सुविधा आहेत. उंचच उंच मॉल आहेत. फ्लाय ओव्हर्स आहेत. पण जर त्यांचा उपभोग घ्यायला मानवजातच शिल्लक राहिली नाही तर मुंबईतल्या, भारतातल्या या सगळ्या गोष्टींचा उपभोग तरी घेणार कोण ? असा प्रश्नही हरिहरन यांनी करत भारतीयांना सुरक्षित वातावरणाची गरज असल्याची जाणीव करून दिली.

close