बाबांची फाईव्हस्टार तयारी !

June 2, 2011 4:16 PM0 commentsViews: 8

02 जून

रामदेव बाबा यांनी 4 जून रोजी उपोषण करणार या आपल्या निर्णयावर ठाम आहे. दिल्लीच्या रामलिला मैदानावर बाबांचं उपोषण होणार आहे. पण या आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणावर निधीही जमवण्यात आला आहे.

रामदेव बाबांचे जवळचे सहकारी आचार्य बाळकृष्ण यांनी निधी जमवण्यासाठी सभा घेतल्या आणि लोकांनी आर्थिक मदतीचं आवाहन केलं. बाबांच्या अनुयायांनी लाखो रुपये त्यांच्या आंदोलनासाठी दिले. हा निधी कसा जमला त्याचा हा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ.

बाबांचा 'मेगाइव्हेंट'

- 1,000 अनुयायी मॅनेजरच्या भूमिकेत- 250 कामगार राबतायत 24 तास- 10 मोठ्या एलसीडी स्क्रीन्स- 70 फूट लांब आणि 8 फूट उंच स्टेज- 50 ऍम्ब्युलन्स आणि सुसज्ज आसीयू – 850 पंखे आणि कूलर्स- दररोज 5 लाख लीटर पाणीपुरवठा- 650 बाथरुम आणि 650 टॉयलेट्स- 500 योगा शिक्षक, 300 वैद्य आणि 1300 डॉक्टर्स सेवेसाठी

बाबा रामदेव यांचा ड्रीम प्रोजेक्ट

- बहाद्राबादमध्ये 100 कोटी रुपये खर्चून पतांजली योगपीठ- दोन वर्षांत बांधून पूर्ण- महत्त्वाकांक्षी योग पीठामध्ये योगा विद्यापीठ- एकाच वेळी 1000 रुग्णांवर उपचार होऊ शकेल, असा निसर्गोपचार विभाग- रुग्णांसाठी भव्य निवासी संकुल – 5000 जण एकाच वेळी योग सराव करु शकतील एवढा हॉल – एका दिवसात 500 रुग्ण उपचार घेऊ शकतील असा जगातला सर्वात मोठा वॉर्डबाबा रामदेव यांची संपत्ती

- केवळ पंधरा वर्षांत जगभरात योगा सेंटर्स, हॉस्पिटल्स, स्पा यांचं साम्राज्य- स्कॉटलंडमध्ये NRI जोडप्याकडून भेट मिळालेली 300 एकरवरील 17 कोटी रु. किंमतीची मालमत्ता- अमेरिकेतील हर्बो वेद या आयुर्वेदिक औषध कंपनीची मालकी- दर महिना 25 कोटी रु. किंमतीच्या औषधांची विक्री

close