माय सन वाज बॉर्न सोल्जर – के. उन्नीकृष्णन

December 13, 2008 2:49 PM0 commentsViews: 1

13 डिसेंबर, पुणे नितीन चौधरी ' माय सन वाज बॉर्न सोल्जर … ' माझा मुलगा लढवय्या होता. हे उद्गार आहेत मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर संदीप उन्नीकृष्णनच्या वडिलांचे. मेजर संदीपच्या आई वडिलांनी पुण्यातील एनडीएला भेट दिल्यानंतर त्यांनी पत्रकारांसोबत आपल्या भावना व्यक्त केल्या.आपल्या जिगरबाज कमांडो मुलाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी के. उन्नीकृष्णन आणि त्यांची पत्नी पुण्याच्या नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडमीमध्ये आले होते. त्यांचा मुलगा मेजर संदीप उन्नीकृष्णननं इथेच लष्करी शिक्षण घेतलं आणि इथेच देशासाठी जान देण्याची शपथ घेतली. 'आठवीत असल्यापासून लष्करात जायचा निर्णय घेतला होता. मला त्याला इंजिनियर बनवायचं होतं. पण तो फिजिकल अ‍ॅक्टिव्हीटीमध्ये उत्तम होता. मला त्याचा खूप अभिमान वाटतो ', असं के. उन्नीकृष्ण यांनी सांगितलं. संदीपच्या बलिदानानं मला स्फूर्ती मिळालीय. मलाही सैन्यात भरती व्हायचंय, असं ते शेवटी म्हणाले. मेजर संदीपच्या काही वस्तू एनडीएच्या संग्रहालयातही ठेवण्याचा मानसही त्याच्या वडिलांनी बोलून दाखवला.

close