अग्निशमन दलाची इमारत बनली भिका-यांचा अड्डा

December 13, 2008 11:50 AM0 commentsViews: 1

13 डिसेंबर उल्हासनगरउल्हासनगरात महानगरपालिकेनं 37 लाख रुपये खर्च करून बांधलेली अग्निशमन दलाची इमारत अवध्या 5 वर्षात निकामी झाली आहे. पालिकेनंच ही इमारत कमकुवत असल्याचा अहवाल दिला. मुख्य म्हणजे या सदोष बांधकामाबाबत अद्याप कुणावरही कारवाई करण्यात आलेली नाही. उल्हासनगर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या इमारतीचं बांधकाम 1987 साली सुरू झालं. तब्बल 10 वर्षांनी इमारत बांधून पूर्ण झाली. अवध्या पाच वर्षात या इमारतीची पुरती वाताहत झाली आहे. खुद्द महापालिकेनंच 2002 साली ही इमारत कमकुवत आणि धोकादायक असल्याचे घोषित केले आणि त्यानंतर ही इमारत रिकामी केली. हे प्रकरण म्हणजे महानगरपालिका अधिकारी, राजकारणी आणि ठेकेदार यांच्या भष्टाचाराचा अस्सल नमु्‌ना आहे असं सामाजिक कार्यकर्ते,नरेश टहलरामानी याचं मतं आहे.महानगरपालिकेचे उपअभियंता पुरूषोत्तम डिंगरेजा यांनी या इमारतीचं बांधकाम टप्प्याटप्यानं आणि वेगवेगऴया ठेकेदाराकडून झालं असल्याने वास्तूूविशारद, महापालिका कर्मचारी आणि ठेकेदार यांच्यापैकी कुणावरही कारवाई न केल्याची कबुली दिली.अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमतानेच जनतेच्या पैशाची धूळधाण करण्यात आली हे या प्रकरणामुळे दिसते. जनसेवेसाठी बांधण्यात आलेली ही इमारत गेली 6 वर्ष भिकारी आणि गर्दुल्ल्यांचा अड्डा बनली आहे.

close