कामगार संघर्ष समितीतर्फे शॉर्टफिल्म फेस्टिव्हलचं आयोजन

December 13, 2008 1:25 PM0 commentsViews: 4

13 डिसेंबर मुंबईविनोद घाटगे मुंबई शहर वसवलं ते इथल्या गिरणी कामगारांनी. पण आजच्या वेगवान मुंबईत नेमका हाच गिरणी कामगार, कष्टक-यांचा वर्ग उपेक्षित राहिला आहे. गिरणगावातल्या अशा तरुणांच्या कलेला वाव आणि न्याय देण्यासाठी एक आगळा-वेगळा प्रयत्न गिरणी कामगार संघर्ष समितीने केला आहे. हुतात्मा बाबू गेनू यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त गिरणी कामगार संघर्ष समितीतर्फे शॉर्टफिल्म फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं. आणि तेही कष्टक-यांना आपलं वाटणा-या भारतमाता थिएटरमध्ये. दोन दिवस चालणा-या या फेस्टिव्हलचं उदघाटन अभिनेत्री रेणुका शहाणेनं केलं. गिरणी कामगार संघर्ष समितीच्या या उपक्रमाचं रेणुका शहाणेनं भरभरून कौतुक केलं.या फेस्टीव्हलमध्ये ऋणानुबंध, गिरणी, शानू टॅक्सी, ऑक्युपेशन मिल वर्कर यासारख्या अनेक शॉर्टफिल्म्स दाखवल्या गेल्या. समाजाच्या तळागाळातील तरुणांमध्ये लपलेला टॅलेंट शोधणं आणि त्याला व्यासपीठ मिळवून देणं हाच या फेस्टीव्हलचा मुख्य उद्देश होता.

close