तरूणांनी केली वारकर्‍यांसाठी मोबाईल सेवा उपलब्ध

June 27, 2011 5:31 PM0 commentsViews: 2

27 जून

वारकर्‍यांच्या स्वागतासाठी गावा-गावात जय्यत तयारी केली जात असते. वारकर्‍यांना लागणार्‍या अनेक उपयुक्त वस्तु मोफत पुरवुन नागरीक वारकर्‍यांची सेवा करताचे चित्र जागोजागी दिसतं. वारकर्‍यांसाठी अशाच एका अनोख्या आणि उपयुक्त सेवेचा लाभ पिंपरीतील तरुणांनी उपलब्ध करुन दिला. तो मोबाईल सर्विस आणि चार्जिंगच्या रुपाने.

शेकडो मैलाचा प्रवास करणार्‍या वारकर्‍यांना त्यांच्या घरच्यांचीही काळजी असते. त्यामुळे प्रत्येक वारकर्‍याच्या घरच्यांशी मोबाईलवरुन मोफत बोलण्याची सुविधा पिंपरीतील तरुणांनी उपलब्ध करुन दिली. अनेकांजवळ वारीत मोबाईलही असतात. पण बॅटरी डाउन झाल्यामुळे घरच्यांशी सवांद साधणं कठीण होत. अश्या वारकर्‍यांच्या मोबाईलची बॅटरी चार्जिंगची सेवाही हे तरुण पुरवत आहे. ह्या सेवेचा लाभ घेण्यासाठी हजारो वारकरी गर्दी करत आहे.

close