जयंत पाटीलांमुळे गृहमंत्रालयात सुधारणा झाल्या नाहीत- गडकरी

December 13, 2008 12:23 PM0 commentsViews: 4

13 डिसेंबर बुलढाणाजयंत पाटील यांनीच तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांचे राजकीय एन्काऊंटर केल्याचा आरोप नितीन गडकरी यांनी केला आहे. ते बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव इथे बोलत होते.जयंत पाटील यांनी गृह मंत्रालयाच्या अनेक महत्वाच्या फाईल रद्द केल्या. परिणामी गृहमंत्रालयात सुधारणा होऊ शकल्या नाही असा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला.जयंत पाटील यांनी यासंदर्भात श्वेत पत्रिका सभागृहापुढे ठेवावी अशी मागणी येत्या हिवाळी अधिवेशनात करणार असल्याचंही गडकरी म्हणाले.

close