नालेसफाई न झाल्यामुळे नागरिकांचे स्वास्थ धोक्यात !

July 3, 2011 8:06 AM0 commentsViews: 2

सिटीजन जर्नालिस्ट गजाजन वानखेडे,औरंगाबाद 02 जुलै

औरंगाबाद महापालिकेने नालेसफाईसाठी तब्बल पन्नास लाख रूपये खर्च केले असले तरी शहरातील अनेक भागात छोटे मोठे नाले तुंबलेले आहेत. मोठ्या प्रमाणावर कचरा, मोकाट जनावरांचा सुळसुळाट आणि डासांचा प्रादुर्भाव यामुळे औरंगाबादकर वैतागले आहेत. काही भागात तापांच्या पेशंटची संख्याही वाढत आहे. औरंगाबादच्या बेगमपुरा परिसरातील इब्राहिम शहा कॉलनीत आमचे सिटीजन जर्नालिस्ट गजाजन वानखेडे यांनी या सफाईचा केलेला हा पर्दाफाश…

close